ग्रामपंचायत कोलवली–देदाळे

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार कोलवली–देदाळे गावात सुमारे ६०० च्या आसपास कुटुंबे राहतात. एकूण लोकसंख्या अंदाजे ३००० च्या पुढे असून त्यामध्ये पुरुष व महिलांचे प्रमाण जवळपास समान आहे. गावामध्ये प्रामुख्याने आदिवासी (वारली) व कुणबी समाजातील नागरिक वास्तव्य करतात. कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, नागली, भाजीपाला व फळबागा ही पिके घेतली जातात. आदिवासी समाजातील अनेक जण शेतमजुरी, वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार तसेच हंगामी मजुरी करतात. काही कुटुंबे कुक्कुटपालन, बकरीपालन व लहान प्रमाणात दुग्धव्यवसायही करतात.
गावात गणेशोत्सव, होळी, दिवाळी तसेच आदिवासी पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शासकीय योजना राबविणे इत्यादी कामे केली जातात. नैसर्गिक संपन्नता, शेतीप्रधान जीवनशैली व पारंपरिक संस्कृती यांमुळे कोलवली–देदाळे हे गाव सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध मानले जाते.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
3157
पुरुष लोकसंख्या
 1536
महिला लोकसंख्या
 1621
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 350
अनुसूचित जाती (SC %)
3.42%
अनुसूचित जमाती (ST %)
45.5%

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय1होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय1होय
उपकेंद्र (Sub Center)होय1होय
अंगणवाडीहोय4होय
प्राथमिक शाळाहोय3होय
माध्यमिक शाळानाही0नाही
उच्च माध्यमिक शाळानाही0नाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही0नाही
समुदाय भवन (Community Hall)होय1होय
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय1होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय1होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय1होय
१३सीएससी केंद्र (CSC Center)नाही0नाही

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत कोलवली-देदाळे

बँकेचे नाव :

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर :

आई एफ एस सी कोड :

पत्ता : ग्रामपंचायत कोलवली-देदाळे ता. – डहाणू , जि. – पालघर ( 401603)